आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड येथील बलात्कार प्रकरणी माजलगावच्या तिघांना अटक; मौलाना अजूनही पसारच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव  /नांदेड- नांदेड येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करणाऱ्या आरोपीला वाचवणाऱ्या माजलगाव येथील भाजपचे माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व एमआयएमचा तालुकाध्यक्ष अशा तीन जणांवर नांदेड येथील इतवारा पोलिस ठाण्यात विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.    


नांदेड येथील चुनाभट्टी देगलूर नाका परिसरातील मदरशामध्ये माजलगाव येथील काही मुली शिकत आहेत. येथील मौलाना साबेर फारुखी याने एका मुलीवर बलात्कार केला होता. हा प्रकार मुलीने आई-वडिलास सांगितल्यानंतर आरोपी मौलाना याला माजलगावला बोलावून काही लोकांनी चांगलेच चोपले.   


तक्रार करण्यात अडथळ
आरोपीच्या विरोधात मुलीचे नातेवाईक माजलगाव शहर पोलिस ठाण्यात  गेले. तेव्हा भाजपचे माजी नगरसेवक खलील पटेल, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष नवाब पटेल, एमआयएमचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष इद्रिस पाशा  यांनी मौलानाच्या विरोधात तक्रार देणाऱ्या मुलीच्या नातेवाइकास अडथळा आणून विरोध केला होता. त्यामुळे मुलीच्या आईने थेट नांदेड येथील इतवारा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मौलाना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याबाबत मौलानाला अप्रत्यक्षरीत्या   मदत करणाऱ्या माजलगाव येथील पाच जणांना  नांदेड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. 


आरोपींना कोठडी
दरम्यान,  खलील गणी पटेल, नवाब पटेल, इद्रिस पाशा बागवान यांच्यासह मौलानाची पत्नी हाजरा साहिन  फारुखी व मौलाना यांच्याविरोधात इतवारा ठाण्यात  विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध  कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपींना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...