आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना नावे का सांगितली म्हणत तिघांवर प्राणघातक हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडवणी- आम्ही डिजिटल बॅनरवर शेण लावले हे तू पोलिसांना का सांगितलेस, अशी विचारणा करत अालेल्या सात जणांनी एकास फायटरने मारहाण केली. भांडणे सोडवण्यास गेलेल्या भाजयुमोच्या तालुकाध्यक्षासह त्याच्या साथीदारावरही हल्ला करण्यात आला. वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे शनिवारी सकाळी ८ वाजता ही घटना घडली. यातील तिन्ही जखमींनी वडवणी ठाण्यात  घाव घेतली. दरम्यान, शनिवारी सायंकाळी दोन्ही गटांवर   परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत. रामजी डोंगरे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

 
पंधरा दिवसांपूर्वी वडवणी तालुक्यातील  चिंचवण येथे मकरध्वजाचा जन्मसोहळा पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने भाजयुमोच्या तालुकाध्यक्षांनी डिजिटल बॅनर गावात लावले होते. रात्री उशिरा कोणीतरी या फलकावर शेण फेकले. त्यामुळे सकाळी चिंचवणसह तालुक्यात तणावाचे वातावरण  निर्माण झाले होते. गावातील काही वरिष्ठ मंडळींनी शांततेचे आवाहन करत हे प्रकरण सामंजस्याने  मिटवले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री पुन्हा प्रकरणावरून   दोन गटात वाद झाला. हा वादही रात्री मिटवण्यात आला.  शनिवारी सकाळी चिंचवण   गावात रामजी डोंगरे हे घरासमोर पेपर वाचत होते. 


तेव्हा त्या ठिकाणी दुसऱ्या गटाचे विनोद महादेव तांबडे, राजेभाऊ आश्रुबा मुंडे, संतोष महादेव तांबडे, रमेश अंबादास बडे, आश्रुबा अभिमान मुंडे, अंगद अंबादास बडे, गवळणबाई महादेव तांबडे हे आले. त्यांनी डोंगरे यांना जातिवाचक शिवीगाळ  केली. यानंतर वाद होऊन हल्लेखोरांनी डोंगरे यांना फायटरने मारहाण केली.  हे पाहून भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष ईश्वर तांबडे हे वाद मिटवण्यासाठी घटनास्थळी आले. त्यांनी दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. या हाणामारीत ईश्वर तांबडे यांच्या डोक्याला लोखंडी फायटरचा गंभीर मार लागला असून रामजी डोंगरे व तुषार बडे या दोघांना मुका मार लागला. गंभीर अवस्थेत तिघांनीही वडवणी पोलिस ठाणे गाठले. याची माहिती मिळताच पोलिस ठाण्याला जत्रेचे स्वरूप आले. पोलिसांनी दोन्ही गटांना शांततेचे अावाहन केले. रामजी संतराम डोंगरे यांच्या तक्रारीवरून  सात जणांविरुद्धद  अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. 


परस्परांविरुद्ध तक्रारीनुसार गुन्हा
 तुझा मेहुणा आम्हाला वारंवार शिवीगाळ करून त्रास देतो, असे म्हणत   रमेश अंबादास बडे याला रॉड व काठीने मारहाण  करण्यात आली. याप्रकरणी बडे याच्या तक्रारीवरून ईश्वर तांबडे, अंगद तांबडे, ज्ञानेश्वर बडे, पुरुषोत्तम तांबडे यांच्याविरुद्ध  दुपारी मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...