आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू, जालन्यातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरूणींचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना जालन्यात घडली आहे. घनसावंगी तालुक्यातील चिंचोली गावात आज दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात शोककळा परसली आहे. जना रणमळे (18 वर्षे) संगीता रणमळे (15 वर्षे) आणि सोमित्रा सातपुते (12 वर्षे) असे बुडून मृत्यु झालेल्या तरूणींचे नावे आहेत.


घनसावंगी तालुक्यातील मच्छिन्नद्रनाथ चिंचोली येथील 6 तरूणी गावाशेजारी असलेल्या तलावात धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुतल्यानंतर त्या पोहण्यासाठी तलावात उतरल्या. त्यांच्यातील एक मुलगी बुडत असल्याचे पाहून, तिला वाचवण्यासाठी दोघी तिच्या दिशेने जाऊ लागल्या परंतु, तलावात पाणी जास्त असल्याने तिघीही तलावात बुडाल्या. या दरम्यान काठावर आलेल्या मुलींनी आरडा-ओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरतील नागरिकांनी या मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...