आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसमत येथे कार ऊसाच्या ट्रॉलीवर आदळली, परभणीचे तिघे ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- भरधाव कार ऊसाच्या ट्रॉलीवर आदळून झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. वसमत शहरातील मयूर बिअर बारजवळ आज (शुक्रवार) पहाटे तीनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

 

गणेश पिराजी गुंजकर (32), सोपान एकनाथ पवार (35), दत्ता सुंदर पवार (38) अशी मृतांची नावे असून ते परभणी जिल्ह्यातील आसेगाव येथील रहिवाशी आहेत.

 
वसमत शहराजवळील मयुर बिअरबार हॉटेलच्या समोर रस्त्यावरून भरधाव वेगात जात होती. कार चालकाला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॉलीचा अंदाज आला नसल्याने कार ट्रॉलीला धडकली. या धडकेत कारचा चेंदामेंदा झाला होवून त्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत वसमत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...