आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळा पैसा पांढरा करण्याचा उद्योग; फुलाई मल्टिस्टेटच्या अध्यक्षांसह पाच जणांना बेड्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- वीस कोटी रुपयांचा बनावट धनादेश आयसीआयसीआय बँकेत क्लेअरिंगसाठी देऊन कोटी रुपयांची रक्कम उचलल्याप्रकरणी आठवडाभरापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाची पाळे-मुळे खोदताना आर्थिक गुन्हे शाखेने फुलाई मल्टिस्टेटच्या चेअरमन बीड येथील इतर चौघांना गजाआड केले असून त्यांना गुरुवारी (दि.१४) न्यायालयाने दि.२० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, हे प्रकरण काळा पैसा पांढरा करण्याचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 


उस्मानाबाद येथील फुलाई मल्टिस्टेट क्रेडिट को. ऑप सोसायटीचे आयसीआयसीआय बँकेच्या उस्मानाबाद शाखेत चालू खाते आहे. या खात्यावर मल्टिस्टेटचे सीईओ प्रदीप मारुती खामकर विकास भाटिया या दाेघांनी मल्टीस्टेटच्या खात्यामध्ये हर्बल लाइफ इंटरनॅशनल इंडिया कंपनी बंगळुरूचा २० कोटी रुपयांचा बनावट धनादेश दि.६ डिसेंबर रोजी क्लेअरिंगसाठी जमा केला होता. धनादेश क्लिअर होऊन रक्कमही फुलाईच्या खात्यावर जमा झाली. यातील कोटी रुपये उचलण्यात आले. दरम्यान, सदरील धनादेश बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर आयसीआयसीआय बँकेची एकच धावपळ उडाली आणि याप्रकरणी चार दिवसांपूर्वी आनंदनगर पोलिस ठाण्यात बँकेचे व्यवस्थापक अशोक शिंदे यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

यामध्ये आरोपी म्हणून फुलाई मल्टिस्टेटचे सीईओ प्रदीप खामकर, विकास भाटिया यांच्यासह इतरांचा उल्लेख करण्यात आला. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. त्यानुसार या शाखेच्या उपाधीक्षक अंजुम शेख, सहाय्यक निरीक्षक जी. एस. राठोड कर्मचाऱ्यांनी तीन दिवसात प्रकरणाची पाळेमुळे खोदण्यास सुरुवात करून बीड येथून कारवाई करून बुधवारी (दि.१३) सय्यद फरहान, सय्यद रशीद, नरेश मनोहर राठोड, धीरज ऊर्फ बंटी धर्मराज कोळी, वैभव ऊर्फ महावीर कोटेचा यांना ताब्यात घेतले. तर उस्मानाबाद येथून फुलाई मल्टिस्टेटचे चेअरमन मारुती खामकर यांनाही अटक करण्यात आली. या पाच जणांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि.२० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील प्रमुख आरोपी सीईओ प्रदीप खामकर यालाही पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतले तर हा धनादेश देणारा आरोपी संतोष राठोड अद्याप फरार आहे. 


व्यवहार तपासण्याची गरज 
- बंगळुरू येथील हर्बल लाइफ कंपनीच्या खात्यातून २० कोटींची रक्कम कमी झाली. त्यानंतर त्यांनी आपण कोणालाच रक्कम दिलेली नसल्याने बँकेकडे धाव घेतली. 
- त्यावेळी सदरची रक्कम उस्मानाबादच्या आयसीआयसीआय बँकेत जमा झाल्याचे समजले. बँकेच्या वरिष्ठांनी हा प्रकार स्थानिक व्यवस्थापक शिंदेंना सांगितला. 
- त्यानंतर त्यांनी फुलाईच्या व्यवस्थापनाकडे याप्रकरणी तगादा लावून सदरची कोटी रुपयांची रक्कम जमा करून घेतली आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. 

 

मल्टिस्टेटच्या व्यवहारावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने अशा संस्थांमध्ये काळा पैसा पांढरा करण्यासाठी मोठा वाव आहे. हा एक प्रकार समोर आल्यानंतर याप्रकरणी फुलाई मल्टिस्टेटच्या व्यवहाराची सखोल चौकशी होणे आवश्यक अाहे. मोठे व्यवहार तपासण्याचीही गरज व्यक्त होत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर इतर संचालकांचेही धाबे दणाणले. ठेवीदारांमध्ये अस्वस्थता आहे.

बातम्या आणखी आहेत...