आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मत्स्यपरीने 15 मिनिटांतच घेतला जगाचा निरोप; बाळ संशोधनासाठी ठेवण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजाेगाई - येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूती विभागात सोमवारी सकाळी नऊ वाजता  एका महिलेने विचित्र बाळाला  जन्म दिला. या बाळाला वैद्यकीय परिभाषेत सिरोनोमेलिया (मत्स्यपरी) असे म्हणातात. जन्मानंतर या बाळाने अवघे १५ मिनिटांत जगाचा निरोप घेतला.


रविवारी  सायंकाळी पट्टीवडगावातील  एक ऊसतोड कामगार  महिला २० मे रोजी रात्री प्रसूती विभागात  दाखल झाली होती. सकाळी आठ वाजता तिला प्रसववेदना सुरू झाल्याने प्रसूतीगृहात नेण्यात आले. प्रसूती विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वर्षा वरपे, डॉ. प्रियंका खराणे, डॉ.कल्याणी मुळे, डॉ. पूनम देसाई, डॉ. सपना चिंचोले यांनी  महिलेची प्रसूती केली. तेव्हा नऊच्या सुमारास महिलेने बाळाला जन्म दिला.

 

नैसर्गिक प्रसूतीनंतर बाळाची तपासणी केली असता बाळास दोन पायांऐवजी दोन पाय जोडलेला एकच पाय तसेच बरोबर लिंग नसलेले शरीर आढळून आले. या बाळाची प्रकृती चिंताजनक होती. पंधरा मिनिटानंतरच बाळाने जगाचा निरोप घेतला.  अशा अवस्थेत जन्मलेल्या बाळाला सिरोनोमेलिया (मत्स्यपरी) असे म्हणतात असे   डॉ. संजय बनसोडे  यांनी सांगितले.  असे  बाळ जन्माला येणे वैद्यकीय क्षेत्रात दुर्मिळ प्रकार असून किमान एक लाख बाळात एखादे  बाळ जन्माला येण्याची शक्यता असून मराठवाड्यात अशा प्रकारचे  बाळ जन्माला येण्याची ही पहिलीच घटना असल्याचे डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.

 

बाळ संशोधनासाठी ठेवण्याचा प्रयत्न
सदरील  बाळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूती विभागातील म्युझियममध्ये  वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व संशोधनासाठी ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.

 

औषधोपचार घेतले नाहीत

गर्भधारणेनंतर ऊसतोड कामगार महिलेने  काेणतेच औषधोपचार घेतलेले नाहीत. महिन्यापूर्वी तीने खासगी रुग्णालयात सोनोग्राफी केली तेव्हा बाळाच्या किडनी आणि फुफ्फुसात अडचण असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले होते. 
डॉ. संजय बनसोडे

बातम्या आणखी आहेत...