आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यात 24 तासांत 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; खळवट लिमगाव, तलवड्यात घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भागवत फरताडे - Divya Marathi
भागवत फरताडे

बीड- बीड जिल्ह्यात २४ तासांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आयुष्य संपवले. पहिल्या घटनेत खळवट लिमगाव (ता. वडवणी) येथील शेतकरी भागवत लक्ष्मण फरताडे (४०)  यांनी सोमवारी रात्री घरामागील झाडाला वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. फरताडेंवर खासगी सावकार, महाराष्ट्र ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दीड लाखांचे कर्ज आहे. मुलीच्या लग्नाचीही चिंता होती.  


दुसऱ्या घटनेत तलवडा (ता. गेवराई) येथील शेतकरी दादाभाऊ हात्ते (६०) यांनी खटकळी येथे पत्र्याच्या शेडच्या पाइपला गळफास घेऊन आत्महत्या केली. अापल्यावरील कर्ज माफ होणार नाही, अशी भीती त्यांना होती.

बातम्या आणखी आहेत...