आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक-कारच्या अपघातात दोघे ठार; भोकरदन रस्त्यावरील बाणेगाव पाटीवर घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र राजूर- ट्रक आणि इंडिका कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने या अपघातात इंडिका कारमधील दोघे जण जागीच ठार तर  एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना राजूरपासून जवळच असणाऱ्या भोकरदन रस्त्यावरील बाणेगाव पाटीजवळ मंगळवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली.  शेलेंद्र देविदास गुजर(४०), समाधान गरबड पारधी (४६) (शेंदुर्णी, ता. जामनेर) अशी मृतांची नावे आहेत.    


राजूर मार्गावरून भोकरदनकडे जाणाऱ्या (एपी-१६ वाय-९९३९) जात असताना समोरून येणाऱ्या इंडिका कार (एमएच-२४ व्ही- ०४०७) यात दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाल्याने कारचा यात चुराडा झाला. या अपघातात कारमधील शैलंेद्र गुजर, समाधान पारधी हे जागीच ठार झाले, तर विलास पोस्ते हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विलास पोस्ते यांना तत्काळ जालना येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. राजूर येथील ग्रामपंचायत सदस्य तथा भाजप कार्यकर्ते राहुल दरक यांनी  अपघात घडल्यानंतर जखमींना तत्काळ मदत करून पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळास पोलिस उपनिरीक्षक  किरण बिडवे, बुणगे, संतोष वाढेकर,  प्रशांत लोखंडे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. ट्रकचालक श्रीरामदास माला (रा. पामर, जि. मछलीपट्टणम) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...