आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा महाराष्ट्रात दुपटीने साखरेचे उत्पादन, भाव गडगडण्याची भीती; कारखाने अडचणीत येणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- गेल्या दोन वर्षांत पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे पश्चिम महाराष्ट्राबरोबरच दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातही उसाची मोठी लागवड करण्यात आली आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत  मागील तीन महिन्यांत उसाचे दुपटीने गाळप  होऊन साखर उत्पादनही दुपटीने वाढले आहे. त्यामुळे आताच साखरेचे भाव गडगडण्यास प्रारंभ झाल्याने कारखानदार चिंतेत पडले आहेत.


साखर आयुक्तालयांतर्गत साखर कारखान्यांवर नियंत्रणासाठी ७ विभाग करण्यात आलेत.   या  विभागांमध्ये  २०१७-१८ च्या हंगामात १८५ साखर कारखाने सुरू आहेत. यामध्ये ९९ सहकारी  तर ८६ खासगी साखर कारखाने आहेत. गतवर्षी एकूण १४९ साखर कारखानेच सुरू होते. यंदा या सर्व कारखान्यांमधून सरासरी ६.८७ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात येत आहे.

 

राज्यातील गाळप हंगाम नोव्हेंबर २०१७ च्या पहिल्या आठवड्यात सुरू झाला.  ६ फेब्रुवारीपर्यंत या सर्व साखर कारखान्यांनी ६२६.३५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३७६.०९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. राज्यातील साखर उताऱ्याची सरासरी १०.७९ इतकी आहे.  यामध्ये पुणे विभागाने सर्वाधिक २४६.२९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून २६४.७७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. मात्र साखर उताऱ्याच्या सरासरीत अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर विभागच पुढे आहे. यंदाचा कोल्हापूर विभागाचा साखर उतारा १२.०२ इतका आहे.

 

गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने उत्पन्न

तुलनात्मकदृष्ट्या विचार करता गतवर्षी सन २०१६-१७ मध्ये एकूण १४९ साखर कारखान्यांनी ३४४.८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३८१.७८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. यंदा अर्ध्या हंगामातच गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने गाळप होऊन (६२६.३५ लाख मे.टन) साखरेचेही दुप्पट उत्पन्न (६७६.०९ लाख क्विंटल) झाले आहे. अाणखी दोन महिने उसाचे गाळप सुरू राहण्याची शक्यता लक्षात घेता उत्पादनात आणखी भर पडणार असून यासाठी आतापासूनच  नियोजन होणे गरजेचे आहे.

 

भाव जाहीर करणारे बेजार

यंदा उसाच्या दरावरून हंगामाच्या सुरुवातीला चांगलाच गाेंधळ निर्माण झाला. याचा फायदा घेत अद्याप अनेकांनी भावच जाहीर केलेले नाहीत. परंतु, स्पर्धेच्या नादात ज्यांनी भाव जाहीर केले ते बेजार झाले आहेत. कारण,  १५ दिवसांत साखरेचे भाव ३८०० वरून ३२०० ते ३४०० रुपयांवर आले आहेत. भाव स्थिर ठेवण्यासाठी सरकारने साखरेचे आयात शुल्क १००  टक्के केल तरी  साखरेचे उत्पादन पाहता भाव आणखी कोसळण्याची शक्यता आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, २०१७-१८ हंगामातीलविभाग  निहाय गाळप (लाखात)... 

बातम्या आणखी आहेत...