आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूर : मृत भावाच्या विधीला जाताना दुचाकीचा अपघात, बहिणीचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा - सख्या भावाच्या तिसऱ्या विधीसाठी पतीसोबत जाताना दुचाकी खड्ड्यात आदळल्याने झालेल्या अपघातात बहिणीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मालंवडी -  तुळजापूर रस्त्यावर   गौडगाव (ता.बार्शी) जवळ घडली.  नंदा जयकुमार मोहिरे (५४, रा. अंजनगाव उमाटे, ता. माढा ) असे मृत महिलेचे नाव आहे. नंदा यांचे भाऊ नंदू कातकर (५२) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. शनिवारी त्यांचा तिसरा दिवस होता.

 

त्यासाठी पहाटे नंदा ह्या पती जयकुमार मोहिरे यांच्यासोबत तुळजापूरमार्गे वडगावला निघाल्या होत्या. तुळजापूर १० किलोमीटर अंतरावर असताना गौडगावजवळ दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यात आदळली. त्यामुळे हिसका बसून नंदा या खाली पडल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...