आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडके धडावेगळे केलेला मृतदेह आढळला; श्वान पथकालाही नाही सापडला माग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडीगोद्री/तीर्थपुरी - अनोळखी २० ते २५ वर्षीय तरुणाचा नग्न अवस्थेत मुंडके धडावेगळे केलेला मृतदेह  पिठोरी शिरसगाव (ता. अंबड) येथे डाव्या कालव्यात रविवारी आढळून आला.  हा खून गुरुवारी संध्याकाळी झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेह फेकताना कालव्याच्या पायऱ्यांवर रक्त आढळून आले आहे. परंतु, जेथे  खून करून मृतदेह फेकला. त्या ठिकाणी काहीच निशाण आढळून आले नाही. यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. 


या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके, गोंदीचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल परजणे यांनी घटनास्थळी भेट दिली.  या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कुठे कोणत्या पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार आहे का, असेल तर त्यांच्या घरच्यांना बोलावून शहानिशा करण्यात येईल, असे पीएसआय अमन शिरसाट यांनी सांगितले.

 

श्वान पथकालाही नाही सापडला माग  
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपासासाठी श्वान पथकास पाचारण केले. परंतु, श्वान माग काढू शकला नाही. दरम्यान, शहागड ते पैठण रस्त्यावरील कुरण फाट्यावरही बीड जिल्ह्यातील सामनापूर येथील अनंत इंगोले या तरुणाला हात पाय बांधून जिवंत जाळले होते. या घटनेचा तपास अजूनही पोलिसांना लागलेला नाही. 

बातम्या आणखी आहेत...