आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांच्या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे खच्चीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे असे वक्तव्य माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी  केले अाहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजाच्या आंदोलनाचे खच्चीकरण होत असून त्यांच्या या मतामुळे आरक्षणाला खिळ बसणार आहे. याची जाणीव तरी पवारांना आहे का ? अशी टिका शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी पवारांवर केली आहे. 


बीड येथे शुक्रवारी शिवसंग्राम भवनावर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार मेटे बोलत होते. महाराष्ट्रात एकीकडे मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करत असताना पवारांनी याबद्दल कधीही मत व्यक्त केले नाही. आघाडी सरकारच्या काळात जी आंदोलने झाली. त्यावेळी ही पवार गप्पच राहिले. २०१४ च्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागेल म्हणून राजकीय फायद्यापोटी मराठा आरक्षणाचा निर्णय घाईने घेण्यात आला. तेव्हाही पवार गप्प राहिले. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश व्हावा. त्यांना आरक्षण मिळावे याला पवारांचा विरोध आहे का जर विरोध असेल तर त्यांनी स्पष्ट करावे, असा सवाल ही आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. या वेळी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलगंडे, बबन माने आदी उपस्थित होते. 

 

पुढच्या पिढीचे नुकसान 
मराठा  आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्गीय आयोग अहवाल देण्याच्या तयारीत असताना पवारांनी  पुढच्या पिढीचे नुकसान होईल,  अशी भूमिका घेऊ नये. ज्या ज्या राज्यात आरक्षणाची चळवळ सुरू आहे तेथील नेते पुढे येत आहेत. आरक्षणासंदर्भात दिल्लीत २५ फेब्रुवारीला बैठक आहे.धनगर, जाट, गुजर, समाजाच्या आरक्षणाबाबत याच बैठकीत योग्य निर्णय होईल, असेही मेटे यांनी सांगितले.

 

 विरोध कशासाठी 
जर आर्थिक निकषावर आरक्षण द्यायचे आहे तर मग आताच्या आरक्षणाला विरोध कशासाठी करतात. मराठा  तरुणांना नोकरीत आरक्षणाची गरज असून ते त्यांना ओबीसीतून मिळाले पाहिजे. एकीकडे समाज रस्त्यावर येवून संघर्ष करत आहे. त्या संघर्षाची तीव्रता पाहून राज्य सरकार आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्याच्या तयारीत  असताना  पवारांनी मात्र आरक्षणाच्या मागणीला फाटे फोडू नयेत. 

 

बातम्या आणखी आहेत...