आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉटर कप स्पर्धेतील 25 गावांत पहिल्या पावसातच सर्वत्र पाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - वॉटर कप स्पर्धेत निवड झालेल्या कळमनुरी तालुक्यातील २५ गावांमध्ये या वर्षीच्या पहिल्याच पावसांत सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. या स्पर्धेत ज्या गावांमध्ये जलसंधारणाची कामे झाली आहेत त्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून हे पाणी जमिनीत मुरत असल्याने जलस्रोतांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे.   


कळमनुरी तालुक्यातील २५ गावांची वॉटर कप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे या गावांमध्ये खासदार  राजीव सातव, नुकतेच बदली झालेले पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, आमदार संतोष टारफे, पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हाधिकारी अनिल भंडारी त्याचबरोबर स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आदींनी वेळोवेळी श्रमदान केले होते. यामुळे ग्रामस्थांनाही श्रमदान करण्याचा हुरूप आला आणि स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व गावांमध्ये शेततळे, बांध निर्मिती, नाल्यांचे खोलीकरण, नाले सरळीकरण, चर खोदणे, समतल बांध अशी विविध प्रकारची पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पनेतील कामे झाली आहेत.

 

जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे वॉटर कप स्पर्धेतील गावांमध्ये झालेल्या जलसंधारणाच्या कामात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या गाव परिसरात झालेल्या पावसाचे पाणी नदीमध्ये वाहून न जाता  जागीच जिरवले जात आल्याने त्या त्या गावातील जलस्रोतांची पाणीपातळी वाढली आहे.  त्याचा फायदा येणाऱ्या काळात त्या गावातील सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...