आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याच्या नव्या संसारावर अग्नतांडव: आगीत 35 क्विंटल कापसासह गहू, दागिने खाक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गारज- नव्याने संसार थाटलेल्या शिवगाव येथील गणेश शहरे या शेतकऱ्याच्या राहत्या झोपडीला लागलेल्या आगीत ३५ क्विंटल कापूस, दहा पोते गव्हासह रोख रक्कम, सोने, चांदीच्या वस्तू व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना सोमवारी औरंगाबाद -मालेगाव रोडवरील शिवगाव पाटी समोरील शेतवस्तीवर घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 


शिवगाव येथील शेतकऱ्यांच्या राहत्या झोपडीला अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. या आगीत एका शेतकऱ्याचा ३५ क्विंटल कापूस जळून खाक झाला. दुपारी दीड वाजताच्या सुमारास लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी परिसरातील शेकडो नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले.  परंतु झोपडीत असलेल्या सिलिंडरमुळे आगीत सिलिंडरचा स्फोट होऊन दुर्घटना घडण्याच्या भीतीने आग विझविण्यास कुणीही धजेना. आग अाटोक्यात येईपर्यंत सर्व कापूस जळून खाक झाला होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.  


भाव वाढेल या आशेवर ठेवला होता कापूस : गणेश धनसिंग शहरे यांच्या शेतात असलेल्या झोपडीला आग लागली होती. यात कापूस खाक झाला.  कापसाला सध्या योग्य भाव मिळत नसल्याने कापूस वेचून घरी आणला होता. दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या झोपडीला अचानकपणे आग लागली आणि घरातील कापसामुळे आगीचा भडका उडाला. 


कुटुंबियांना लग्नाला जाणे महागात पडले 
ही आग लागली त्यावेळी शहरे कुटुंबीय नातेवाइकांच्या लग्नासाठी बाहेरगावी गेलेले होते. परिसरातील रहिवाशांनी त्यांना फोनवरून माहिती दिली. माहिती मिळताच ते घरी येईपर्यंत संपूर्ण संसार जळून खाक झालेला होता. 

बातम्या आणखी आहेत...