आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा, नंतर केले असे नाटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने गळा दाबुन खुन करून पुरावा नष्ट करणाऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराला परिस्थीती जन्य पुराव्यावरून दोषी ठरवत बीडच्या तदर्थ सत्र न्यायाधीश नाजेरा शेख यांनी बुधवारी (ता.२५) दुपारी जन्मठेप व दाेन हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. महिलेचा मुलगा व शिर्डी येथील हॉटेल मॅनेजरने दिलेले साक्ष महत्वाची ठरली. 


बेलुरा (ता.बीड) येथील आशा तुकाराम पांचाळ (वय ३४) हिचे नवगण राजुरी येथील सलुन चालक बाळासाहेब वैद्य (वय ४०) याच्याशी प्रेमसंबध जुळले होते. या प्रेमसंबंधात पती तुकाराम पांचाळ याचा अडसर होत असल्याने २३ मे २०१४ रोजी पहाटे आशा व बाळासाहेब याने तुकारामला संपवण्याचा कट रचला. तुकाराम पांचाळ हा झोपत असताना त्याचा दोघांनी गळा आवळून खून केला.तसेच तुकारामच्या छातीत दुखत असल्याचा बनाव करत त्याला नवगण राजुरीच्या रूग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करून तुकाराम याला बीड येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करा, असे सांगीतले होते. परंतु अाशा व बाळासाहेब याने तुकारामला दवाखान्यात न नेता थेट घरी आणले. यावेळी नातेवाईकांची आरडा ओरड पाहुन पोलिस पाटलांनी बीड ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणीत केल्यानंतर तुकारामचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचा वैद्यकीय अहवाल मिळाला. दिला. याप्रकरणी तुकाराम यांचा भाचा युवराज कांबळेच्या तक्रारीवरुन बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान तुकाराम पांचाळ याचा मुलगा युवराज याची साक्ष महत्वाची ठरली. घरी कोणी नसतांना बाळासाहेब हा अाशाला भेटण्यासाठी येत होता. तेव्हा आई अाशाबाई ही आम्हाला घराबाहेर पाठवत असे अशी साक्ष युवराजने दिल्याने या प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 


२३ साक्षीदार तपासले 
या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने २३ साक्षीदार तपासण्यात आले. सर्व परिस्थितीजन्य पुराव्यानुसार तदर्थ सत्र न्यायाधीश नाजेरा शेख यांनी आशा पांचाळ व बाळासाहेब वैद्य या दोघांना दोषी ठरवून दोघांनाही जन्मठेप व दाेन हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने मिलींद वाघीरकर यांनी काम पाहीले. 

बातम्या आणखी आहेत...