आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडतर रस्त्यावर प्रसूती; बाळ थोडक्यात बचावले; बाळाला श्वास घेण्यास अडचण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीर्थपुरी- घनसावंगी तालुक्यातील  मुरमा ते भोगगाव या दोन गावांच्या दहा किमी रस्त्यावर चार ते सहा फुटांचे  खड्डे पडले आहेत. या गावांसाठी परभणी जिल्ह्यातील खासदार बंडू जाधव, तर राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे आमदार आहेत. या दोन्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या राजकारणात रस्त्यांचे काम रखडले आहे. या रस्त्यावरील दैनंदिन अपघातातून अनेकांना अपंगत्व, तर प्रसूतीसाठी नेण्यात येणाऱ्या मातांची धोकादायक रस्त्यातच प्रसूती होत असल्याने जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  रविवारी याच खडतर रस्त्यावर सुजाता पानखडे (२२, रा. बाणेगाव ता. घनसांवगी) या गरोदर मातेची  धोकादायक प्रसूती झाली. त्यामुळे बाळालाही श्वास घेण्यास अडचण आली होती. परंतु, तातडीने उपचार मिळाल्याने बाळ सुखरूप आहे. 


मुरमा व भोगगाव या गावातील नागरिक अनेक वर्षांपासून या समस्येचा सामना करत आहेत. या रस्त्याकडे बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष असल्यामुळे या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. चार वर्षांपूर्वी थातूरमातूर डागडुजी केली होती. या रस्त्यावरून महाविद्यालयीन युवती, प्रवासी आपल्या दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झाल्याच्याही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. प्रतिवर्षी पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दुरवस्था होत असते. त्यामुळे आपोआपच मोठी वाहतूक कोंडी होऊन अपघाताला निमंत्रण मिळते.    या दहा किलोमीटर रस्त्यांवर मुरमा, रामसगाव, शेवता, लिंगसेवाडी, बाणेगाव, विठ्ठलनगर, सौन्दलगाव, भोगगाव ही गोदाकाठची गावे येतात.

बातम्या आणखी आहेत...