आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीची शस्त्रक्रिया करून डावा डोळा निकामी केल्‍या प्रकरणी नेत्रतज्ञाला दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- चुकीची शस्त्रक्रिया करून निष्काळजीपणाने तक्रारदाराचा डावा डोळा निकामी केल्याबद्दल डॉ.कुणाल कोंडेवार यांच्यावर ठपका ठेवत जिल्हा ग्राहक व तक्रार निवारण मंचाने गुरुवारी ८० हजारांचा दंड ठोठावला आहे.


बळीराम मुरलीधर रत्नपारखी यांनी शहरातील नारायण हॉस्पिटल, गणपती चौक येथील डॉ.कुणाल कोंडेवार यांच्या दवाखान्यात ६ मार्च २०१४ रोजी डाव्या डोळ्याची शस्त्रक्रिया केली.  डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रत्नपारखी यांचा डावा डोळा पूर्णत: निकामी होऊन अंधत्व आले. त्यानंतर तक्रारदाराने बऱ्याच ठिकाणी उपचार घेतले. परंतु डोळा पूर्ववत झाला नाही. अखेर तक्रारदाराने अॅड.डी.व्ही.पांडे यांच्यामार्फत डॉ.कुणाल कोंडेवार यांच्याविरुद्ध डावा डोळा निकामी झाल्याबद्दल ग्राहक मंचात धाव घेतली असता गुरुवारी जिल्हा ग्राहक मंचाच्या अध्यक्षा एस.बी.सातपुते, सदस्य जी.एच.राठोड यांच्यापुढे बळीराम रत्नपारखी यांनी आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांचे डावा डोळा निकामी झाल्याबद्दल अपंगत्वाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरून डॉ.कुणाल कोंडेवार यांच्याविरुद्ध सबळ पुरावे दाखल केले असता ग्राहक मंचाने कोंडेवार यांना शस्त्रक्रियेचा खर्च ८ हजार रुपये व त्यावरील ९ टक्के व्याज मानसिक शारीरिक त्रासापोटी ५ हजार रुपये आणि तक्रार खर्च ३ हजार असा देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक मंचाने दिला आहे. तक्रारदारातर्फे अॅड.डी.व्ही.पांडे यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...