आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती वाद; तरुणाने एसपी कार्यालयात घेतले विष, पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- घरगुती वादातून तरुणाने थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात विष घेतल्याचा प्रकार बुधवारी दुपारी चार वाजता घडला. दरम्यान, विष घेतलेल्या तरुणाचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. 


शहरातील कबाडगल्ली भागातील रहिवासी विनायक अतुल जव्हेरी (वय १८) याने बुधवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान अधीक्षक कार्यालयात विष घेतले. वडिलांकडून मला मारहाण करण्यात येत होती म्हणून घाबरून मी अधीक्षक कार्यालयात आलो, तेथील पोलिसांनी मला शहर ठाण्यात जाण्याबाबत सांगितले. शहर ठाण्यात गेल्यानंतर तिथे फारसे सहकार्य न मिळाल्याने भाजी मंडईतून उंदीर मारण्याचे विष घेऊन अधीक्षक कार्यालयात मी घेतल्याचे विनायकने दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. दरम्यान, त्याच्या गल्लीतील नागरिक व पोलिस यांच्या म्हणण्यानुसार विनायकचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही. त्याने वडिलांच्या खिशातून पैसे चोरले आणि त्यामुळे वडिल त्याला रागावल्याने रागाच्या भरात त्याने हा प्रकार केल्याचे सांगण्यात आले.  अधीक्षक कार्यालयात विनायकने विष घेतल्यानंतर तेथील पोलिसांनीच त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

 

डीवायएसपींची भेट  
या प्रकरणानंतर पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात येऊन विनायकची भेट घेतली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुलेमान सय्यद आणि उपनिरीक्षक शिवदर्शन बिरादार यांनीही जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. विनायकच्या विरोधातच आता आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे पीआय सय्यद यांनी सांगितले.  

बातम्या आणखी आहेत...