आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वैजापूर - धोंदलगाव (ता. वैजापूर) येथील अल्पवयीन मुलीला शेगाव, अकोला येथे पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी दोघांना न्यायालयाने शुक्रवारी शिक्षा सुनावली. मुख्य आरोपी संतोष उत्तम वाघ (२५) याला दहा वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याचा मित्र दिलीप कचरु डमाळे (२८) याला तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
या घटनेतील पीडित मुलगी ही नववीची विद्यार्थिनी आहे. ती २३ डिसेंबर २०१३ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मधल्या सुटीत जेवण करुन परत शाळेत जात होती. त्यावेळी संतोष वाघ व त्याचा मित्र दिलीप डमाळे हे दोघे मोटारसायकलवरुन तेथे आले. आम्ही तुला शाळेत सोडतो, असे म्हणत दोघांनी बळजबरीने तिला दुचाकीवर बसवले व ओरंगाबाद बसस्टँडवर नेले. तेथे दिलीप याने संतोष व पीडित मुलीला बसमध्ये बसवले. त्यानंतर संतोष याने तिला आधी शेगाव व नंतर अकोला येथे नेले. अकोला येथे १७ जानेवारीपर्यंत वेळोवेळी अत्याचार केला. १८ जानेवारी रोजी संतोषने तिला औरंगाबाद येथे सोडले. त्यानंतर पीडित मुलीने रेल्वेने रोटेगाव गाठून वैजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन संतोष वाघ व दिलीप डमाळे यांच्याविरुद्ध बलात्कार व पळवून नेणे व बाल लैंगिक अपराधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एपीआय प्रतिभा बिरारे यांनी तपास करुन कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीच्या वेळी एकूण दहा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यात पीडित मुलीची साक्ष, वैद्यकीय व न्यायवैद्यकीय अहवाल महत्त्वाचा ठरला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.