आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड: मुंबईच्या टोळीकडून दोन कट्टे, 12 काडतुसे पकडली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - येथील रेल्वे स्टेशन परिसरात गावठी पिस्तुलाने गोळीबार करून दहशत पसरवणारे व गावठी पिस्तूल विकणाऱ्या मुंबईच्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या टोळीकडून दोन गावठी बनावटीची पिस्तूल, १२ जिवंत काडतुसे व मोबाइल असा ६८ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त करून तीन जणांना ताब्यात घेतले आहे.


नांदेड शहरातील नवीन पुलाजवळील गायत्री मंदिराजवळील एका खोलीत ही टोळी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती, फौजदार विनायक शेळके यांच्या पथकाने ही टोळी असलेल्या खोलीवर छापा टाकून या टोळीतील तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल, १२ जिवंत काडतुसे, खंजर व मोबाइल असा ऐवज पोलिसांनी जप्त करून तिघांना ताब्यात घेतले. या आरोपींनी रेल्वे स्टेशन परिसरात दहशत पसरवण्यासाठी गोळीबार केल्याची कबुली दिली. या आरोपींना वजिराबाद पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आला आहे.

बातम्या आणखी आहेत...