आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांना ब्‍लॅकमेल करणा-या दोघांना न्यायालयीन कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांना तुमच्या विरोधात एका महिलेची व्हिडिओ क्लिप असल्याचे सांगत ५० लाखांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल करण्यात आल्याच्या प्रकरणातील मास्टरमाइंड धर्मराज बुधवंत व त्याचा सहकारी गणेश कुदळे या दोघांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.  


 महंत विठ्ठल महाराज यांना महिलेची त्यांच्यावर आरोप असलेली व्हिडिओ क्लिप दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. आरोपी अमोल औटे याची पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला जामीन दिला. तर चालक संतोष मोरे व प्रकरणातील महिला गायत्री बुधवंत यांनाही जामीन मिळाला. यानंतर   प्रकरणातील मास्टरमाइंड धर्मराज बुधवंत व त्याचा सहकारी गणेश कुदळे यांना अटक करण्यात आली. त्यांना सुरुवातीला २ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. शनिवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले  असता न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडीचे आदेश दिल्याचे तपास अधिकारी विशाखा धुळे यांनी सांगितले. 

 

नेमके पैसे कुणाकडे   
या प्रकरणात महाराजांनी आरोपींना दहा लाख रुपये दिल्याचे म्हटले आहे. मात्र अमोल औटे याने चौकशीत पैसे धर्मराज बुधवंतकडे दिल्याचे सांगितले.  बुधवंत याने मला पैसे दिले नसल्याचे सांगितल्याने आणखी पेच वाढला आहे.  

 

चौकशीत काही नाही   
धर्मराज बुधवंत या प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे. मात्र, पोलिस कोठडीत असताना त्याने पोलिसांना ठोस काही माहिती या प्रकरणाबाबत दिलेली नाही. अद्यापही त्याची बनवाबनवी सुरूच आहे. पोलिसी खाक्या दाखवूनही तो गप्प असल्याने तपासावर लक्ष असेल.

 

आणखी क्लिप   
गायत्री बुधवंतसह अन्य काही महिलांच्या एक ते दोन क्लिप अमोलच्या मोबाइलमध्ये सापडल्या असून त्याही विठ्ठल महाराजांवर आरोप करताना आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यामुळे एकूण क्लिप किती याचीही पोलिस खातरजमा करत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...