आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरूला गेलेल्या दोघी तरुणांसोबत सापडल्या, फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर केले पलायन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज - केज तालुक्यातील एकाच गावातून एक महिला बेपत्ता झाली तर एका तरुणीला पळवून नेल्याची तक्रार दीड महिन्यापूर्वी पोलिसांत दाखल झाली होती. मोबाइल लोकेशनवरून त्या दोघी बंगळुरूला असल्याचे उघड झाल्यावर केज  पोलिसांनी बंगळुरू पोलिसांच्या मदतीने त्यांना  एका खोलीतून  ताब्यात घेतले. सोमवारी पोलिस  त्या दोघी फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून निघून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी या छाप्यात बंगाल व बिहार येथील दोन तरुणांनाही पकडले आहे.


केज तालुक्यातील एका गावातील महिला व अल्पवयीन मुलगी २३ फेब्रुवारी २०१८   केजहून दवाखान्यातून येते, म्हणून घरातून बाहेर पडल्या. त्या घरी गेल्याच नाहीत. केज पोलिसांत महिला हरवल्याची तर मुलीला अज्ञाताने पळवल्याची तक्रार दाखल होती.   काही दिवसांपूर्वी अल्पवयीन  मुलीने गावातील तिच्या एका  मैत्रिणीला फोन करून आम्ही सुखरूप असल्याचे  सांगितले त्या मुलीने तिच्याआईवडिलांना ही माहिती दिली.

 

तर आईवडिलांना पोलिसांना सांगितले. पोलिसांनी  त्या मैत्रिणीला विश्वासात घेऊन तिचा नंबर मिळवला. पोलिसांनी  नंबरचे सीडीआर काढून मोबाइलचे  लोकेशन   मिळवले तेंव्हा  मुलगी व महिला बंगळुरूला असल्याचे समोर आले.   पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अंकुश नागटीळक ,जमादार आरडवार हे बंगळुरूला रवाना झाले. त्यांनी  स्थानिक पोलिसांच्या मदतीने बंगळुरू येथील एका खोलीवर छापा  मारला असता ती बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलगी  आणि दोन अनोळखी तरुण अशा चौघांना ताब्यात घेऊन सोमवारी केजला आणले.  मुलगी  अल्पवयीन असल्याने तिची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.ती महिला व  मुलगी रेडिमेड कपडे बनवणाऱ्या मिलसाठी शर्टची कॉलर तयार करण्याचे काम करत होत्या, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

फेसबुकवर झाली होती दोघींची मैत्री
फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून  त्या दोघी निघून गेल्याचे निष्पन्न झाले. त्या दोघी केजहून धारूर, अंबाजोगाई करीत अंबाजोगाईहून पुण्याला गेल्या. पुण्यातून रेल्वेने बंगळुरूला गेल्या. तेथून  अॉटोने  किरायाच्या खोलीपर्यंत  पोहोचल्या. बंगळुरू येथील दोन तरुणांच्या मदतीनेच त्या केजहून बंगळुरूला पोहोचल्याचा संशय पोलिसांना आहे.

बातम्या आणखी आहेत...