आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यातील तीन तालुक्यांत १२ तासांत ४ अपघात; पाच ठार, ७ जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- बीड जिल्ह्यात शुक्रवारी १२ तासांत गेवराईसह वडवणी,अंबाजोगाई या तीन तालुक्यांत झालेल्या वेगवेगळ्या चार अपघातांत पाच जण ठार, सात जण झाले. दाेघांची प्रकृती गंभीर आहे. 


बीडच्या भालदारपुरा येथील आमेर अन्वर शेख (३०) हा तरुण दुचाकीवरून पत्नी व अडीच वर्षांच्या पुतण्यासह अंबडकडे जात हाेता. बीड-गेवराई मार्गावरील पाडळशिंगी जवळ समोरून आलेल्या ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात अमेर यांचा मृत्यू झाला तर पत्नी व पुतण्या गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर ट्रकने दुचाकीमागे असलेल्या कारलाही(एम एच ०३, बीसी ०७८२) समोरुन धडक दिली. यामध्ये कारमधील शेख युसूफ शेख युनूस, सय्यद मंजूर मनोद्दीनजमीर, शेख जमीर शेख बाबामियाँ, शेख सादेक सिकंदर (सर्व रा. मासूम कॉलनी बीड ) हे पाच जण जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुपारनंतर काही रुग्णांना औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. या अपघातानंतर नागरिकांनी ट्रकचालक प्रताप ठाकूर याला पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 


दुसरा अपघात वडवणी तालुक्यात घडला. ताडसोन्ना येथून वडवणीकडे येणाऱ्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या टिप्परने शुक्रवारी दुपारी १ वाजता पोखरी फाट्यावर जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील केशव लंबाटे (४५), कुंडलीक मुंडे (३५ दोघे रा. ताडसोन्ना) हे जागीच ठार झाले. 


कार रस्त्याच्या बाजूला बराशीत

तिसऱ्या अपघातात कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरून जात असलेले आडस गावाचे माजी सरपंच विष्णू पोटे (४५) हे ठार झाले. या अपघातात कार चालक संतोष सिरसट जखमी झाला. हा अपघात धारूर-अंबाजोगाई रोडवर केंदेवाडी फाट्याजवळ दुपारी सव्वा तीन वाजता घडला. अपघातानंतर कार रस्त्याच्या बाजूला बराशीत गेली. 


दुचाकीवरून घसरून युवकाचा मृत्यू 
चौथ्या अपघातात अंबाजोगाई तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील उमेश बबन सोमवंशी (३२) हे लोखंडी सावरगाव येथून गुरुवारी रात्री गावाकडे दुचाकीवरून निघाले होते. वाटेत लोखंडी सावरगाव - सोमनाथ बोरगाव मार्गावर त्यांची दुचाकी घसरून ते पडले. गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी नागरिकांना ते दुचाकींसह मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी मृतदेह स्वाराती रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

बातम्या आणखी आहेत...