आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ठाण्यातील 4 लाख 66 हजारांचा मुद्देमाल चोरीस; पोलिस निरीक्षकाची त्याच ठाण्यात तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी- वाळूसह विना पासिंग ट्रॅक्टर ट्रॉली , रिक्षाचे टायर, सिट,  दोन दुचाकी, देशी-  विदेशी दारू, कारचे मशीन पार्ट  असा विविध कारवायांत जप्त  केलेला   ४ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिस ठाण्यातूनच चोरी गेल्याचा प्रकार माजलगाव  ग्रामीण  पोलिस ठाण्यात समोर आला आहे.  दोन महिन्यानंतर ठाण्याच्या निरीक्षकाने आपल्याच पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


 माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध कारवायांत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल दोन महिन्यांपूर्वी  चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला. माजलगाव येथील ग्रामीण ठाणे पूर्वी शहराच्या  हद्दीत होते. या  ठिकाणी पोलिसांनी केलेल्या विविध कारवायांत  ७१.५ ब्रास  वाळूसह एक ट्रॅक्टर ट्रॉली, दोन दुचाकी , अॉटो रिक्षाचे सिट, टायर,  ५८ हजार रुपये किमतीची  देशी विदेशी दारू असा एकूण   ४ लाख ६६ २२२ रुपयांचा  मुद्देमाल जप्त करून ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आला होता. काही दिवसांनंतर या पोलिस ठाण्याचे  स्थलांतर नव्या इमारतीत झाले.  पोलिस निरीक्षक म्हणून संजय पवार हे त्या वेळी   प्रभारी अधिकारी होते. दरम्यानच्या काळात हा  मुद्देमाल ठाण्याच्या आवारातून गायब झाला. या प्रकरणी   सहायक पोलिस उपनिरीक्षक आर.डी.सिरसट यांनी   ठाण्यातून मुद्देमाल चोरीस गेल्याचा  अहवाल ३० डिसेंबर २०१७ रोजी  पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांना दिला.  


अधीक्षकांनी  तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय पवार  यांच्याकडील पदभार काढून  घेत त्यांना बीड मुख्यालयाला बोलावले. याप्रकरणी स. पो. अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी  या प्रकरणी चौकशी  करून या प्रकरणी  जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीधर यांना अहवाल दिला.

 

अज्ञात आरोपीवर गुन्हा
पोलिस अधीक्षकांच्या आदेशावरून २० जानेवारी २०१८ रोजी  पोलिस निरीक्षक मिर्झा वहाब बेग  यांच्या तक्रारीवरून  माजलगाव पोलिस ठाण्यात  अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...