आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूरहून उस्मानाबादकडे येणाऱ्या बसला भीषण अपघात, 45 जण जखमी; 7 चिंताजनक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- ढोकी गावाजवळ लातूरहून उस्मानाबादकडे येणाऱ्या बसला भीषण अपघात झाला. अपघातात 45 प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यात 7 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले. जखमींना उपचारासाठी उस्मानाबाद येथे हलवण्यात आले आहे.

 

भरधाव बस रस्त्याच्या कडेला उलटून झाल्याने हा अपघात झाला. काही प्रवाशावर ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

 

भरधाव वेगात असल्याने झाला अपघात...
- मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या बसचे अचानक ब्रेक दाबल्याने हा अपघात झाला आहे.
- जखमींमधील तिघांची अवस्था गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
- घटनेनंतर औरंगाबाद-उस्मानाबाद महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. 
- या अपघातात बस ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. बस पलटल्यामुळे पुर्णपणे चेंदामेंदा झाली आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा, अपघातात चेंदामेंदा झालेल्या बसचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...