आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: पुरात अडकलेल्या रेल्वेमधून ४५० प्रवाशांची सुखरूप सुटका; धुवाधार पावसाचा सलग चाैथ्या दिवशीही कहर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस मंगळवारी सुरूच होता. पावसाने आता अापला माेर्चा मुंबर्इच्या उत्तरेकडे वळवला अाहे. विरार, नालासाेपारा, वसर्इ, डहाणू या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्याचा फटका सकाळी मुंबर्इत येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या नालासाेपाऱ्याच्या पुढे अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल झाले. नालासाेपारा येथे रेल्वे रुळावर तब्बल ४०० मि.मी. पाणी जमा झाल्यामुळे या पुराच्या पाण्यात वडाेदरा एक्स्प्रेस अडकली. या गाडीत अडकलेल्या जवळपास ४५० प्रवाशांना एनडीअारएफच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत संध्याकाळी सुरक्षित ठिकाणी हलवले. पाऊस कमी हाेण्याची काेणतीही चिन्हे नसून हवामान विभागाने येत्या २४ तासांत अाणखी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला अाहे. 


मुसळधार पावसामुळे नालासाेपारा, विरार, वसर्इ भागाला अगाेदरच माेठा तडाखा बसला हाेता. साेमवारी रात्रीपासून पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे या संपूर्ण परिसराला पुराचे स्वरूप अाले. विरार स्थानक ते नालासाेपारा स्थानक या अाठ किलाेमीटरच्या परिसरातील रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. विरार स्थानकापासून जवळच खाडी अाहे. मात्र, खाडीचे पाणी अाल्यामुळे रेल्वे रूळ दिसेनासे झाले हाेते. रेल्वे रुळांवर माेठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे मुंबर्इकडे येणाऱ्या राजकाेट एक्स्प्रेस, गाेल्डन टेम्पल एक्स्प्रेस, गुजरात मेल, अवंतिका एक्स्प्रेस, गंगापूर एक्स्प्रेस, साैराष्ट्र जनता एक्स्प्रेस, लखनऊ - बांद्रा एक्स्प्रेस, मुंबर्इ- राजधानी एक्स्प्रेस, अाॅगस्ट क्रांती एक्स्प्रेस, रंकापूर एक्स्प्रेस, गाझीपूर - बांद्रा एक्स्प्रेस, अौंध एक्स्प्रेस अशा तब्बल १२ लांब पल्ल्याच्या गाड्या उंबरगाव ते नालासाेपारा खाेळंबून राहिल्याने प्रवाशांची काेंडी झाली. भुकेमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी पश्चिम रेल्वेने स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने विविध स्थानकांवर खाद्य पाकिटे देण्याची व्यवस्था केली. एनडीअारएफ अाणि काेस्ट गार्डचे पथकही घटनास्थळी मदतीसाठी पोहोचले. 


माणिकपूरमधून ६६ जणांना सुखरूप बाहेर काढले 
वसईतील माणिकपूर परिसरातही पूरस्थिती असून या भागात अडकलेल्या ६६ जणांना एनडीआरएफने बाहेर काढले. यात वृद्ध व लहान मुलांचाही समावेश आहे. या संपूर्ण परिसरात एनडीआरएफ व अन्य यंत्रणांचे मदतकार्य अद्याप सुरू अाहे. 
मिठागरातील ४०० कामगारांना काढले 


वसर्इ पूर्व भागातील मिठागर वस्तीत पाणी पुराचे पाणी शिरल्यामुळे येथील कामगार साेमवारपासून अडकले अाहेत. या ४०० कामगारांनी घर साेडण्यास नकार दिला. मात्र, एनडीअारएफ जवानांच्या मदतीने या कामगारांना मिठागर वस्तीतून सुखरूप बाहेर काढण्यात अाले. 


नाशिक मार्गाला पुलाला तडे 
नाशिक महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या भिवंडी बायपास रस्त्यावरील साकेत पुलाला साेमवारी रात्री तडे गेले. या पुलाच्या नाशिकहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या भागाला तडे जाऊन तेथील डांबर निखळल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला हाेता. मात्र, मंगळवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी करून तत्काळ या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यामुळे मुंबईकडे वाहतूक भिवंडी, कळवा मार्गावरून वळवण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...