आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईसोबत धुणे धुण्यासाठी गेलेल्या 5 वर्षांच्या चिमुकलीचा पाण्यात पडून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीर्थपुरी- आईसोबत चारीवर धुणे धुण्यासाठी गेलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा पाण्यात पडून मृत्यू झाला. घनसावंगी तालुक्यातील मुरमा येथे  धूलिवंदनाच्या दिवशी दुपारी हा प्रकार घडला.
मुरमा गावाजवळ किरणनगर वस्तीवरील अर्जुन मुकणे यांची पत्नी शुक्रवारी दुपारी जायकवाडीच्या डाव्या कालव्यावरील चारीवर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या.

 

त्यावेळी त्यांची लहान मुलगी भक्ती मुकणे हीसुद्धा त्यांच्यासोबत होती. धुणे धुतल्यावर मुलगी परत गेली असेल असे समजून मुलीची आई घरी परतली. मात्र तेव्हा त्यांना मुलगी दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेऊनही भक्ती सापडत नसल्याने काही गावकरी चारीजवळ तिचा शोध घेत होते. दरम्यान काही अंतरावर एक लहान मुलगी वाहत असल्याचे युवकांनी सांगितले. त्यांनी ग्रामस्थांनी पुढे शोध घेतला, असता घटनास्थळापासून दीड कि. मी. अंतरावर उढाण कंडारी शिवारात तिचा मृतदेह आढळून आला. 

 


 

बातम्या आणखी आहेत...