आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीमध्ये वीज पडून 8 शेळ्या ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- सेनगाव तालुक्यातील खिल्लार शिवारात वीज पडून ८ शेळ्या ठार झाल्याची घटना घडली. खुडज येथील कुंडलिक झटे यांनी त्यांच्या २० शेळ्या चरण्यासाठी खिल्लार शिवारात नेल्या होत्या. १२ मार्च रोजी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू झाला.

 

त्यामुळे सर्व शेळ्या एका झाडाखाली उभ्या राहिल्या. तर मेंढपाळ दुसऱ्या झाडाखाली थांबला. यावेळी शेळ्या उभ्या राहिल्या त्या झाडावर वीज कोसळली आणि त्यात ८ शेळ्या जागीच ठार झाल्या. याबाबत सेनगाव कार्यालयात सदर शेतकऱ्याने  अर्ज करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...