आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू लसीकरणामुळे, पालकांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- परळीत रविवारी नऊ महिन्यांच्या बालिकेचा अचानक मृत्यू झाला. शनिवारी देण्यात आलेल्या मेंदूज्वर आणि गोवरच्या लसीमुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल, अशी भूमिका आरोग्य विभागाने घेतली आहे.   


परळी शहरातील वडसावित्रीनगर भागातील आरती नंदकुमार जाधव (९ महिने) या बालिकेचा रविवारी सकाळी अचानक मृत्यू झाला. दरम्यान, आरोग्य विभागाकडून नऊ महिने आणि दीड वर्ष झालेल्या बालकांना मेंदूज्वर आणि गोवरची लस देण्यात येते. शनिवारी आरतीला ही लस देण्यात आली होती. यानंतर ताप येऊन तिच्या अंगावर लाल फोडही आले होते. असे तिच्या पालकांनी सांगितले. लसीकरणाची रिअॅक्शन येऊनच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी करत संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यासाठी शहर ठाण्यात धाव घेतली होती. दरम्यान, या प्रकरणी शवविच्छेदन अहवालानंतरच गुन्हा नोंद करता येईल, अशी पालकांची पोलिसांनी समजूत काढली. यानंतर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. 

 
प्रकरणाची चौकशी सुरू

बालिकेचा मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालातूनच समोर येईल. आरोग्य विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून दोन अधिकारी परळीला पाठवण्यात आले, अशी माहिती बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी  डाॅॅ. आर.बी. पवार यांनी दिली.


पोलिओला फटका

दरम्यान, पोलिओ डोस दिल्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याची अफवा परळीत काही वेळ पसरली होती. त्यामुळे रविवारी पल्स पोलिओ अभियानाला शहरात फटका बसला. अनेकांनी मुलांना पोलिओ लस पाजून घेणे टाळले.

बातम्या आणखी आहेत...