आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतून पळवलेली मुलगी पूर्णा येथे सापडली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- औरंगाबाद येथील सातारा परिसरातील एका तरुणीस महिलेने फूस लावून पळवून आणले होते. या युवतीस रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने पूर्णेत ताब्यात घेण्यात आले असून तिला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 


औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील एक सतरा वर्षीय तरुणी किराणा दुकानातून सामान आणण्यासाठी गेली असता ती  घरी परतलीच नाही.  तिला हायकोर्ट काॅलनीतील प्रियंका संजय चौधरी या महिलेने फूस लावून पळवून नेले. औरंगाबादहून 
तरुणीस सोबत घेऊन ही महिला पूर्णा रेल्वेस्थानकावर आढळली. महिलेच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्याने रेल्वे सुरक्षा पोलिसांनी चौकशी केली असता तरुणीस या महिलेने फूस लावून पळवून आणल्याचा प्रकार उघड झाला.  महिलेनेही  युवतीस फूस लावून पळवून आणल्याची कबुली दिली. या सर्व प्रकाराची माहिती पूर्णा रेल्वे पोलिसांनी औरंगाबाद येथे दिली. त्यानंतर हा प्रकार संबंधित तरुणीच्या घरच्या लोकांनाही कळवण्यात आला. 


त्यानंतर या तरुणीस घरातील लोक व औरंगाबाद येथील सातारा  ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल एस.बी.चव्हाण यांच्या स्वाधीन करण्यात आले. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अजय कुमार व शेख जावेद यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही तरुणी तिच्या घरच्यांच्या स्वाधीन केल्याचे रेल्वे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.