आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती वादातून नांदेडमध्ये भरचौकात एकाचा खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - घरगुती वादातून चाकूने भोसकून एकाचा खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी शहरातील नमस्कार चौकात घडली. खून करून आरोपी फरार झाला आहे. भररस्त्यातच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


शहरातील नमस्कार चौकात मोरया ग्लास अँन्ड अॅल्युमिनियमचे दुकान नव्यानेच टाकण्यात आले आहे. या दुकानावरून बळी तिडके व शंकर तिडके (रा. दिग्रस, ता. अर्धापूर) यांच्यात  वाद होता. मंगळवार  १३ मार्च रोजी दुपारी दुकानात बळी तिडके व शंकर तिडके यांच्यात मोठा वाद झाला. यात बळी तिडके याने शंकर तिडके यास चाकूने भोसकले. हा वार वर्मी बसल्याने शंकर तिडके याचा मृत्यू झाला.  यानंतर  बळी तिडके पसार झाला. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी गुुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...