आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीजवळ दोन मुलांना सोडले अन् पत्नीने प्रियकरासोबत केले पलायन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिरसाळा- ऊसतोडणीसाठी कारखान्यावर गेलेल्या विवाहितेचे ट्रॅक्टरचालकाशी प्रेमसंबंध जुळले. विवाहितेने कारखान्यावरून परत आल्यानंतर दोन लेकरांना पतीजवळ सोडून प्रियकरासोबत पलायन केल्याची घटना धारूर तालुक्यात घडली आहे. 


पतीच्या तक्रारीनुसार दोघे ऊसतोड कामगार असून त्यांना तीन वर्षांची मुलगी आणि दीड वर्षाचा मुलगा असून हे संपूर्ण कुटुंब धारूर तालुक्यात राहते. काही महिन्यांपूर्वी पूजा आणि तिचा पती सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी गेले होते. या ठिकाणी त्यांच्या गावातीलच एक युवक ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता. याच ठिकाणी दोघांचे सूत जुळले. कारखाना बंद झाल्यानंतर हे सर्वजण धारूर तालुक्यातील त्यांच्या गावी माघारी आले. ४ एप्रिल रोजी सर्वजण गाढ झोपेत असल्याची संधी साधून मध्यरात्री दोन्ही चिमुरड्यांना घरातच सोडून ट्रॅक्टरचालकासोबत तिने पळ काढला. या प्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...