आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात एकटीच टीव्ही पाहत होती चुलती, पुतण्याने मागून येऊन केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव- घरात टीव्ही पाहत असलेल्या चुलतीवर पुतण्याने काेयत्याने हल्ला केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथे शुक्रवारी दुपारी अडीच वाजता घडली. या हल्ल्यात डाेके, पाठीवर गंभीर वार लागल्याने चुलतीवर माजलगावात प्राथमिक उपचार करून अंबाजाेगाईला पाठवण्यात आले आहे. जयाबाई अंगद नाईकनवरे (३२) असे जखमी चुलतीचे नाव आहे. हल्ल्यानंतर पुतण्या स्वत:हून माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 


माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील अंगद नाईकनवरे यांची पत्नी जयाबाई उर्फ मीरा (३२) या शुक्रवारी दुपारी अडीच वाजता घरात टीव्ही पाहत बसल्या होत्या. गावातील त्यांचा चुलत पुतण्या अर्जुन गंगाधर नाईकनवरे हा घरात घुसला. त्याने हातातील कोयत्याने जयाबाई यांच्यावर वार सुरू केले. जयाबाईच्या मानेवर,डोक्यावर,पाठीवर,हाताच्या बोटावर गंभीर वार झाल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. घरात जयाबाईचा आेरडण्याचा आवाज ऐकून शेजारी मदतीला धावले. त्यांनी जयाबाईला माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. 


पुतण्या स्वत:हून ग्रामीण ठाण्यात गेला 
चुलतीवर हल्ला करण्यात आल्यानंतर अर्जुन नाईकनवरे हा स्वतःहून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिस निरीक्षक मिर्झा बेग, सहाय्यक पोलिस निरीक्षक बी.एच. कदम, पोलिस जमादार संजय गुंड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून हल्ल्यात वापरण्यात आलेला कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान या प्रकरणी माजलगाव पोलिस ठाण्यात सांयकाळपर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता. 


जयाबाई एकट्या घरी होत्या 
माजलगाव तालुक्यातील सावरगाव घाट येथील अंगद नाईकनवरे यांना गावात चार एकर जमीन आहे. एक मुलगा, एक मुलगी आहे. हल्ला झाला तेव्हा जयाबाई या एकट्या घरी होत्या. तर पती काही खाजगी कामाच्या निमित्ताने माजलगाव येथे आले होते. ही घटना कळाल्यानंतर अंगद हे सावरगाव येथे पोहोचले. 

बातम्या आणखी आहेत...