आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेज (बीड)- पासपोर्ट व व्हिसासाठी दिलेले पैसे परत न केल्याच्या कारणावरून मस्साजोग ( ता. केज ) येथील एका अंध तरुणाचे अपहरण करण्यात आले होते. केज पोलिसांनी कर्नाटकात जाऊन या अपहृत तरुणाची सुटका केली. तेलंगणा राज्यातुन अपहरणकर्त्यास अटक करण्यात आली आहे. अपहरण झालेल्या तरूणाच्या घरात पोलिसांना 13 पासपोर्ट सापडले आहेत.
मस्साजोग येथील युनूस शब्बीर शेख ( वय 28 ) हा दोन्ही डोळ्याने अंध तरुण पासपोर्ट व व्हिसा काढून देण्याचे काम करीत होता. त्याने तेलंगणातील वीरशैवम सुरजाप्पा उपारी ( रा. माडगी, ता. जहिराबाद, जि. संगारेड्डी ) याच्याकडून पासपोर्ट व व्हिसा काढून देण्यासाठी तीन लाख रुपये घेतले होते. मात्र पासपोर्ट व व्हिसा काढून दिला नाही. त्यामुळे आरोपीने दिलेली रक्कम परत मागितली. परंतु रक्कम देण्यास टाळाटाळ लावल्याने नऊ जानेवारी 2018 रोजी आरोपीने त्याच्या साथीदाराच्या मदतीने युनूस शेख याचे कारमधुन अपहरण केले. आरोपीने तरुणाच्या आईला फोनवरून तीन लाख रुपये द्या आणि तुमच्या मुलाला घेऊन जा अशी धमकी दिली. या तरुणाची आई यैरोबिया शब्बीर शेख यांनी मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. याप्रकरणी केज पोलिसात सहा जणांवर गुन्हा नोंद झाला होता. पोलिस निरीक्षक गिरीश हुंबे यांनी तपासाची चक्रे फिरवून अपहरणकर्त्यांनी तरुणास डांबून ठेवलेल्या ठिकाणाची माहिती काढली. पोलिस उपनिरीक्षक अंकुश नागटिळक, जमादार मुकूंद ढाकणे, रामदास आवळे यांच्या पथकाने कर्नाटक राज्यात जाऊन तरुणाची एका घरातुन सुटका केली.त्यानंतर पोलिसांनी तेलंगणा राज्यातील माडगी ( ता. जहीराबाद जि. संगारेड्डी ) येथुन वीरशैवम सूरजाप्पा उपारी याला बुधवारी मध्यरात्री अटक केली.
13 पासपोर्ट सापडले
ज्या तरुणाचे अपहरण झाले होते. त्या मस्साजोग येथील युनूस शेख याच्या घरात पोलिसांना 13 पासपोर्ट सापडले आहेत. ते पासपोर्ट बनावट आहेत का ? तसेच पासपोर्ट काढून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारे रॅकेट आहे का ? याचा ही पोलिस तपास करीत आहेत.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.