आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुकट्या प्रवाशांकडून २ लाख रुपये दंड वसूल; नांदेड रेल्वे प्रशासनाची कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड -  दक्षिण मध्ये रेल्वे नांदेडच्या वतीने २६ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच २७८ विना तिकीट प्रवाशांकडून  दोन लाख रुपये दंड वसूल केला. ही कारवाई रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने केली. या पथकान सहायक वाणिज्य व्यवस्थापक रवी वर्मा यांच्यासह २४ तिकीट तपासणीस सहभागी झाले होते.  


दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभाग विना तिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तसेच तिकीट धारक प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी तिकीट तपासणी मोहीम हाती घेत असते. तिकीट तपासणीसोबतच रेल्वेतील इतर सुविधांचीही तपासणी या पथकाने केली. यामध्ये स्वच्छता, खाद्यपदार्थ, पाणी, त्यांच्या किमती, पाण्याची उपलब्धता, पंखे, लाइट यांची चालू स्थिती, इत्यादींचीही तपासणी केली. ही मोहीम पहाटे ५ वाजता सुरू करण्यात आली. यात नांदेड ते सेलू या दरम्यान धावणाऱ्या  रेल्वे गाड्यांमध्ये अचानक धाडी टाकण्यात आल्या. यात दोन पॅसेंजर गाडया आणि ११ एक्स्प्रेस गाड्या तपासण्यात आल्या. तसेच २६ अनधिकृत विक्रेते खाद्यपदार्थ विकत होते त्यांच्यावरही कार्यवाही करण्यात आली. त्यांना पकडून त्यांच्या कडून ५८ हजार रुपये रुपये दंड वसूल करण्यात आला.  पुन्हा हे फेरीवाले रेल्वे गाड्यांमध्ये अशा प्रकारे अनधिकृत पदार्थ विकणार नाहीत याची त्यांना ताकीद देण्यात आली. तसेच सेलू रेल्वे स्थानकातील अधिकृत कँटीनमध्ये अनधिकृत पाणी बॉटल विकण्यात येत होत्या. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...