आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या वाघाचे आता कासव; तीन वर्षे अभ्यास करूनही सरकार नापास: अजित पवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड/गंगाखेड- मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्र सरकारचा अभ्यास सुरु आहे, पास होण्याचे काही नाव नाही. तर शिवसेनेच्या वाघाचे आता कासव झाले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. 

 

 

हल्लाबोल यात्रेदरम्यान अजित पवार आणि धनंजय मुंडे लोहा दौऱ्यावर होते. त्यावेळी अजित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारकडे कृषीविषयक धोरणच नाही. तीन वर्षात निकृष्ट दर्जाची बांधकामे झाल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीने काँग्रेससोबत 15 वर्ष सरकार चालवले. पण एका पक्षाचा आमदार दुसर्‍या पक्षाच्या प्रचारासाठी स्टेजवर गेला नव्हता. शिवसेनेचे नांदेडचे आमदार भाजपचा प्रचार मनपा निवडणुकीत करत होते, याकडे त्यांनी लक्ष वेधत शिवसेनेच्या वाघाचे कासव झाल्याचे सांगितले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि गंगाखेड येथील सभेची माहिती

 

 

 

बातम्या आणखी आहेत...