आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय शिंदेची ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेसाठी निवड; यापूर्वी पटकावला होता किताब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- तालुक्यातील शिवणी येथील युवा कुस्तीपटू अक्षय शिंदे याची पुणे येथे होऊ घातलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सोमवारी निवड झाली. बीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजित निवड चाचणीत (गादी गट) 100 किलो वजन गटातील चमकदार कामगिरी बजावणारा अक्षय आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

 

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 24 डिसेंबर रोजी भोगगाव (जि. पुणे)  येथे पार पडणार आहे.

या स्पर्धेसाठी बीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेच्या वतीने निवड चाचणी स्पर्धा दिंदू्रड (ता. माजलगाव) येथे रविवारी पार पडली. यात अक्षयने अव्वलस्थान पटकावले. त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी त्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. अक्षय हा शिवणी गावचा रहिवासी असून शेतकरी कुटुंबातील आहे. तो सध्या मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे येथे कुस्तीपटू ज्ञानेश्वर मांगडे व हिंद केसरी अमोल बुचुडे यांच्या तालमीत सराव करत आहे. 24 वर्षीय अक्षयने ग्रामीण भागात राहून कुस्तीमध्ये आपले नाव कमावले आहे. त्याने यापूर्वी अहमदनगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावले.

 

मुंबई येथे गिर्को कुस्तीमध्ये 120 किलो वजन गटात महाराष्ट्र केसरी हा किताब मिळविला आहे. 10 वर्षे वयापासून तो कुस्तीचा सराव करतो. हरियाणा येथील कुस्तीपटू बलजीत यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कुस्तीतील अनेक डाव अवगत केले. त्याच्या निवडीबद्दल आ. आर. टी. देशमुख, जि.प. सदस्य जयसिंह सोळंके, कुस्तीगीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोविंद चव्हाण, शेकापचे बाळासाहेब घुमरे, राहुल गुरखुदे, दिनकर लांडे, नवनाथ चव्हाण आदींनी स्वागत केले.

 

बीड जिल्ह्याच्या अपेक्षा वाढल्या

यापूर्वी शिवाजी केकाण व सय्यद चाऊस या दोन भूमिपुांनी कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेला आहे. त्यानंतर अक्षय शिंदे याने सातत्य व परिश्रमाच्या जोरावर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत धडक मारली आहे. त्याच्याकडून बीडकरांना मोठ्या अपेक्षा असून या स्पर्धेकडे कुस्तीेप्रेमींचे लक्ष वेधले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. अक्षय शिंदेचे निवडक फोटो

बातम्या आणखी आहेत...