आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून, बलात्कार व दरोड्याच्या सर्व गुन्ह्यांची बीड पोलिसांकडून उकल;राज्यात पाचव्या स्थानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- गुन्ह्यांच्या बाबतीत नेहमीच बदनाम असलेल्या बीड जिल्ह्याची प्रतिमा गत वर्षभरात सुधारली आहे. दाखल गुन्ह्यांची उकल करण्यात बीडचे पोलिस  अव्वल ठरले आहेत तर राज्यातही टॉप फाइव्हमध्ये स्थान मिळाले असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. दरम्यान, पोलिस महासंचालक सतीश माथुर यांनी नुकतेच राज्यभरातील रँकिंग जाहीर केले आहे.  


गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्रातील बिहार अशी काही वर्षांपूर्वी बीडची ओळख होती. मात्र गत वर्षभरात पोलिस अधीक्षक गोविंदराजन श्रीधर आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. बीड पोलिसांनी खून, दरोडा, बलात्कार, जुगार अशा गंभीर गुन्ह्यांची शंभर टक्के उकल केली आहे. दाखल गुन्ह्यांची उकल करण्यात बीडने औरंगाबाद परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. शिवाय, राज्यातील टॉप फाइव्ह जिल्ह्यांमध्येही पाचवे स्थान मिळवले आहे. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर,डॉ. अभिजित पाटील, विशाल आनंद, भाग्यश्री नवटाके, स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, विद्यमान पोलिस निरीक्षक घनश्याम पाळवदे, दरोडा प्रतिबंधक विभागाचे एपीआय श्रीकांत उबाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गुन्ह्यांची उकल केली. 

 

८२.३५ टक्के गुन्हे समोर  
शरीराविरुद्धचे व मालाविरुद्धच्या दाखल गुन्ह्यांमध्ये ८८.८० टक्के गुन्हे उघडकीस आले आहेत. तर जबरी चोरीचा तपास व चोरट्यांच्या मुसक्या अावळून तक्रारदारांना त्यांचा ऐवज परत करण्यात बीड पोलिस राज्यात पाचव्या क्रमांकावर आहेत. 

 

सन्मानपूर्वक ऐवज परत  
चोरी, दरोड्याच्या प्रकरणात हस्तगत ऐवज तक्रारदारांना सन्मानपूर्वक प्रदान करण्याचा उपक्रम जिल्हा पोलिस दलाने राबवल्याने नागरिकांतही पोलिसांविषयीची प्रतिमा सुधारत आहे. आतापर्यंत ५२ तक्रारदारांना २१ लाख ४८हजार रुपयांचा ऐवज परत करण्यात आला.

 

चांगल्या कामाचा प्रयत्न  

पदभार घेतल्यापासून चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आयजींच्या मार्गदर्शनाखाली आयएसओ ठाणे, एमपीडीए, मकोकाच्या कारवाया केल्या. सामान्यांमध्ये पोलिस दलाची चांगली प्रतिमा असावी यासाठी उपक्रम राबवले आहेत. हे यश सर्व सहकाऱ्यांचे आहे.  
- गोविंदराजन श्रीधर, पोलिस अधीक्षक, बीड

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाणा...

 

बातम्या आणखी आहेत...