आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्याध्यापकावर अॅट्रॉसिटी, महिलांवर कामात अडथळ्याचा गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- प्रेरक पदाचे नियुक्तीपत्र देण्याच्या वादात तालुक्यातील बेलोरा येथे मुख्याध्यापकावर अॅट्रॉसिटी तर महिलेंवर सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याचा गुन्हा येथील ग्रामीण ठाण्यात दाखल झाला आहे.

 

शेषराव जाधव (५०), मुख्याध्यापक, जि. प. प्रशाला, बेलोरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गावातील सविता  इंगळे व जानकाबाई बबन खडसे यांनी  प्रेरक पदाचे नियुक्ती आदेश का देत नाहीत असे म्हणून शनिवारी सकाळी ९ वाजता शाळेत शिवीगाळ करून चपलांनी मारहाण केली.  

 

तर सविता इंगळे यांच्या  फिर्यादीनुसार, मुख्याध्यापक जाधव यांनी आपण  अनुसूचित जातीचे असल्याने पात्र असूनही नियुक्तीपत्र देण्यास टाळाटाळ केली आणि विचारणा केली असता जातीवाचक शिवीगाळ केली.

बातम्या आणखी आहेत...