आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैरीचे आमिष दाखवून सात वर्षांच्या बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न, 75 वर्षीय वृद्धाचे कृत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना/कुंभारपिंपळगाव- अंगणात खेळत असलेल्या सात वर्षीय बालिकेस कैरी देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर ७५ वर्षांच्या वृद्धाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. घनसावंगी तालुक्यातील एका गावात शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला. याप्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. 


पीडित बालिका इयत्ता पहिलीत शिकत आहे. गुरुवारी दुपारी शाळेतून आल्यानंतर ती मैत्रिणींसोबत अंगणात खेळत होती. त्याचवेळी आरोपी विक्रम माधव घुले (७५,पाडळी, ता.घनसावंगी) याने मुलीस इशारे करून घरात बोलावून घेतले. त्यानंतर रामफळ व कैरी देण्याचे आमिष दाखवून त्याने घराचे दार बंद केले. या बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. घाबरल्याने या बालिकेने आरडाओरड केली असता इतर मुले धावत आली. तेव्हा पीडित बालिकेने आपली सुटका करून घेतली. दरम्यान तिने सदर प्रकार आई-वडिलांना सांगितल्यानंतर याप्रकरणी आरोपीविरुद्ध घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी आरोपी विक्रम घुले यास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल मधुकर बिक्कड हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...