आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड: मामा बरोबर वाद; पेठ बीडमध्ये युवकाचा खून; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - मामाबरोबर झालेल्या भांडणात छातीवर मार लागल्याने युवकाचा मृत्यू, घटना बीड शहरातील पेठ बीड भागात प्रकाश आंबेडकर नगरमध्ये घडली. या प्रकरणी पाच जणांविरोधात पेठ बीड पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.


अमर नारायण हातागळे (वय १८)  हा पेठ बीड भागातील प्रकाश आंबेडकर नगरमध्ये राहतो.शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्याचा व त्याच्या मामाच्या कुटुंबियांचा वाद झाला. प्रकरण हाणामारी पर्यंत गेले. यावेळी मारहाणीत अमर हातागळेच्या छातीवर गंभीर मार लागला. वर्मी मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शव विच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पेठ बीड पोलिसांत रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

 

काही काळ तणाव
दरम्यान, या घटनेनंतर प्रकाश आंबेडकर नगर भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करुन तणाव निवळला. जिल्हा रूग्णालयातही मोठी गर्दी जमली होती.

 

कारण अस्पष्ट
अमर हातागळे व त्याच्या मामामध्ये नेमक्या कोणत्या कारणामुळे वाद झाला उशीरापर्यंत समोर आले नव्हते. आरोपींची नावेही समोर आली नव्हती दरम्यान, आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पेठ बीड पोलिसांचे एक पथक रवानाही झाले होते

 

बातम्या आणखी आहेत...