आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BEED: डॉक्टरला ‘भूल’; आठ लाख घेऊन रुग्णाने केला पोबारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - आजारी असल्याचा बहाणा करून डॉक्टरकडे तपासणीसाठी आलेल्या रुग्णाने संधी साधून डॉक्टरच्या टेबलच्या ड्राॅवरमधून आठ लाखांची रक्कम घेऊन घेऊन पोबारा केल्याची घटना बुधवारी दुपारी बीड शहरात उघडकीस आली.डॉ. चंद्रकांत नवनाथ नेवडे यांचा बीड शहरात जालना रोडवर ‘कृष्णाई’ नावाचा दवाखाना आहे. बुधवार, ६ जून रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास डॉ. नेवडे दवाखान्यात असताना त्यांच्या वडिलांनी बी-बियाणे आणि दवाखान्याचे उपकरणे खरेदीसाठी ८ लाख रुपये त्यांच्याजवळ आणून दिले. सदरील रक्कम डॉ. नेवडे यांनी एका पिशवीत घालून स्वतःच्या केबिनमधील टेबलच्या ड्राॅवरमध्ये ठेवली.

 

त्यानंतर ३.४५ वाजताच्या सुमारास त्यांच्याकडे श्रीनिवास नावाचा रुग्ण आला. श्रीनिवास हा महामार्गाचे काम करणाऱ्या आयआरबी कंपनीसाठी काम करतो. त्याने केबिनमध्ये आल्यानंतर पोट दुखत असल्याचे डॉ. नेवडे यांना सांगितले. त्याची तपासणी करण्याच्या उद्देशाने हातमोजे आणण्यासाठी डॉ. नेवडे शेजारच्या खोलीत गेले. हातमोजे घेऊन केबिनमध्ये परत आल्यानंतर डॉक्टरांना तिथे रुग्ण आढळून आला नाही. त्यांनी त्याला इतरत्र पहिले पण तो न दिसल्याने त्यांनी केबिनमध्ये येऊन ड्राॅवर उघडून पहिले असता त्यांना आठ लाख रुपये ठेवलेली पिशवी लंपास झाल्याचे दिसून आले. सदरील रक्कम श्रीनिवास यानेच लंपास केल्याची तक्रार त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. डॉ. नेवडे यांच्या तक्रारीवरून श्रीनिवास याच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...