आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या बाजारात जाणारे 60 हजारांचे रॉकेल पकडले, बीडमध्‍ये दोघांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असलेले २ हजार ४०० लिटर निळे रॉकेल बीड ग्रामीण पोलिसांनी सापळा लावून पकडले. दोन जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी दिली.  


नामलगाव फाट्याजवळ एक पिकमध्ये निळ्या रॉकेलच्या बारा टाक्या काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. पोलिस उपनिरीक्षक बालाजी ढंगारे व सहकाऱ्यांनी नामलगाव फाट्यावर सापळा लावला. यामध्ये पिकअप (क्र. एम. एच. ४३, एफ ९२७७) तपासणी केली असता २०० लिटर रॉकेलच्या १२ टाक्या आढळून आल्या. ज्याची किंमत साठ हजार रुपये आहे.


पिकअप व रॉकेल असा ४ लाख १० हजारांंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बब्बू शेख आणि नईम शेख या दोघांविराेधात पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...