आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड : सर्पमित्राची आत्महत्या; इंजेक्शनद्वारे घेतले सापाचे विष; आकस्मिक मृत्यूची नोंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- सर्पमित्र असलेल्या एका तरुणाने सापाचे विष इंजेक्शनद्वारे शरीरात टोचून घेत आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये सोमवारी सकाळी समोर आली. मात्र, शिवाजीनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अद्याप अधिकृत कारण समोर आलेले नाही.


शहरातील खासगी रुग्णालयातील कंपाऊंडर दीपक सर्जेराव गायकवाड (२२, फुलाईनगर,बीड) हा सर्पमित्र आहे. सोमवारी सकाळी एका हॉटेलमध्ये तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याचे अंगही पूर्ण काळेनिळे पडले होते. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अधिक चौकशीत त्याने इंजेक्शनद्वारे सापाचे विष शरीरात टोचून घेतल्याचे लक्षात आले.

 

प्रेमप्रकरणातून आत्महत्या?
दरम्यान, प्रेमप्रकरणातून हा प्रकार झाल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली. सर्पमित्र साप पकडल्यानंतर त्यांचे विष काढत असतील तर हा प्रकार गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...