आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघुशंकेचा बहाणा करत छत्रभुज झाला चतुर्भुज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेने शनिवारी धारूर येथे सहायक पोलिस उपनिरीक्षकासह एक पोलिस कर्मचारी व एक मध्यस्थ  अशा तिघांना  ४० हजारांच्या लाच प्रकरणात   रंगेहाथ पकडले होते. मात्र, चौकशी सुरू असताना शनिवारी रात्री या प्रकरणातील मुख्य आरोपी एसीबीच्या कार्यालयातून फरार झाला.


खंडणीच्या गुन्ह्यातून एकाचे नाव वगळण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक नीलेश केळे याने एक लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. सदर तक्रारीवरून बीड एसीबीने सापळा रचला.  तडजोडीनंतर तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच घेताना सहायक उपनिरीक्षक अमीर इनामदार, पोलिस कर्मचारी दत्तात्रय बिक्कड यांच्यासह मध्यस्थ छत्रभुज साहेबराव थोरात  यांना एसीबीने रंगेहाथ पकडले तर एपीआय केळे व  अशोक हंडीबाग  हे हजर नसल्याने बचावले होते.  पाचही जणांविरोधात धारूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 


 पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या तिघांना एसीबीच्या बीड कार्यालयात आणले होते. यावेळी चौकशी दरम्यान छत्रभुज थोरात हा लघुशंकेचा बहाणा करून कार्यालयाच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून फरार झाला.  सर्वांंच्या अटकेची प्रक्रिया करत असताना थोरातही फरार असल्याचे समोर आले. याप्रकरणी एसीबीचे भाऊराव राठोड यांच्या फिर्यादीवरून छत्रभुज थोरात याच्यावर बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...