आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळमध्‍ये पर्यटकांना मधमाशांचा चावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरूळ- येथील जगप्रसिद्ध लेणीमध्ये  रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास लेणी क्रमांक ५ ते १० च्या दरम्यान आग्या मोहळाच्या मधमाशांनी चावा घेतल्याने तीन पर्यटक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  कपिल प्रवीण ठाकरे (३०), मनीषा कपिल ठाकरे (२६, दोघे रा.  म्हाडा कॉलनी, औरंगाबाद),  चंद्रशेखर पंजाबराव गव्हाणकर (रा. औरंगाबाद) हे तीन पर्यटक मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. 

 

लेणी पर्यटन करत असताना अचानक आग्या मोहळाच्या मधमाशांनी कपिल व मनीष यांच्यावर हल्ला चढवला. त्यामुळे अन्य पर्यटकांनी लेणीच्या बाहेर जाण्यासाठी पळ काढला. तर बाजूलाच कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी हारूण शेख , योगेश नाडे, जलद प्रतिसाद पथकाचे कर्मचारी सोनू गायकवाड, गजानन ताठे, रोहन शिंदे, मुकुंद नाइक, गजानन डोईफोडे, राम माळी, प्रकाश ठोकळ, आकाश गवळी यांच्यासह सुरक्षा कर्मचारी यांनी  तातडीने धूर करत ठाकरे कुटुंबाच्या अंगावरील मधमाशा बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. मदतीसाठी आलेले पर्यटक चंद्रशेखर
गव्हाणकर यांनाही मधमाशांनी चावा घेऊन जखमी केले. जखमी पर्यटकांना वेरूळ येथील मंगल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...