आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंचाचा वाढदिवस, अख्ख्या गावाचं श्रमदान; दिवसभरात 2 हजार घनमीटरचे खाेदकाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - बुधवारी तळपत्या उन्हात अंबाजोगाई तालुक्यातील हाताेला गावातील गावकरी श्रमदानात गुंतले हाेते. निमित्त हाेते गावचे सरपंच अॅड. जयसिंग चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त महाश्रमदानाचे. तालुकाभरातून अालेल्या हजाराे गावकऱ्यांनी यात सहभागी हाेत एकाच दिवसात श्रमदानाच्या माध्यमातून दाेन हजार घनमीटरचे खाेदकाम केले. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची टीमही हाताेल्यात अाली हाेती. त्यांनीही गावातील विकास कामांचा अाढावा घेतला.

 

अंबाजोगाई तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत हातोला हे गाव सहभागी झाले आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच हातोला गावात जलसंधारणाच्या कामांना मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. गेल्या ४० दिवसात दोनवेळा महा श्रमदान इथे झाले बुधवारी झालेल्या महाश्रमदानाला अंबाजोगाई तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. अंबाजोगाई तालुक्यातील मानवलोक, ज्ञानप्रबोधिनी, भारतीय जैन संघटना , शिवतेज ट्रेडर्स ग्रुप, एस.संस्था, वैद्यनाथ बँक कर्मचारी, मैत्री ग्रुप, वकील मित्रमंडळ, मेडिकल, फार्मासिस्ट असोसिएशन, ग्रामसेवक संघटना, पंचायत समिती कर्मचारी, जवळगाव ग्रामस्थ यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आज झालेल्या श्रमदानात आपला सहभाग नोंदवला.

 

ग्रामस्थांसह दीड हजार महिला व पुरुष श्रमदानात सक्रिय होते. यावेळी दोन हजार घनमीटरचे खोदकाम श्रमदानातून झाले. एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात श्रमदानातून काम होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी एटीए चंद्रा फाउंडेशनचे संचालक निमेशभाई शहा माजी ,नगराध्यक्ष राज किशोर मोदी, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, डॉ.दिनकर केकाण, अ‍ॅड.सुनील पन्हाळे, भारतीय जैन संघटनेचे तालुका अध्यक्ष धनराज सोळंकी, प्रा.डॉ.गणेश मुडेगावकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 

५१ हजार रोख व पाचशे लिटर डिझेलची मदत
हातोला येथे आज झालेल्या महाश्रमदानाच्या वेळी आलेल्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी गावात सुरू असलेल्या कामासाठी मदत केली. यावेळी रघुवीर देशमुख यांनी २५ हजार रूपये तर राजकिशोर मोदी यांच्याकडुन ३०० लिटर डिझेल, मनोज लोढा २०० लिटर डिझेल तर शेख बागन साहब पाच हजार रूपये, अभिजीत चव्हाण पाच हजार रूपये , राहुल चव्हाण पाच हजार रूपये, अरूण चव्हाण पाच हजार रूपये, मनोज चव्हाण पाच हजार रूपये, उन्नती महिला स्वयंम सहाय्यता बचत गट ११०० रूपये अशी मदत गावचे सरपंच अॅड.जयसिंग चव्हाण यांच्याकडे साेपवण्यात आली.

 

बातम्या आणखी आहेत...