आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनंजय मुंडे यांची खेळी; रमेश कराड पुन्हा राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्‍ये, पंकजा मुंडेंना धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - एकेकाळी स्व. गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी तसेच पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ रमेश कराड राष्ट्रवादीच्या गळाला लागले असून राष्ट्रवादीने कराड यांना विधान परिषदेचे तिकीट दिल्याने कराड यांनी बुधवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर सकाळी ११ वाजता त्यांनी अापली उमेदवारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केली.

 

धनंजय मुंडे यांनी खेळलेल्या या खेळीने पंकजा मुंडे गटाला माेठा धक्का बसल्याचे मानले जात अाहे.  बुधवारी राष्ट्रवादी भवन येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, सतीश चव्हाण आदींच्या उपस्थितीत कराड यांचा राष्ट्रवादी प्रवेश साेहळा पार पडला.    


दरम्यान, रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली. भाजपची हवा अाेसरू लागली अाहे. कराड यांचा पुन्हा राष्ट्रवादी प्रवेश पंकजांना माेठा धक्का अाहे. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत राज्यपातळीवर चर्चा सुरू असून उस्मानाबादेत राष्ट्रवादीचाच उमेदवार राहील, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...