आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीड - ज्यूस पिण्यासाठी थांबलेल्या व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून चोरट्यांनी ५ लाख ४० हजारांची रक्कम लांबवल्याची घटना सोमवारी बीड शहरातील मध्यवर्ती व गजबजलेल्या साठे चौकात भर दुपारी साडेबाराच्या वाजता घडली. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
श्रीराम शंकराल झंवर (वय ६८ रा. नवगण राजुरी) हे कापसाचे व्यापारी असून नवगण राजुरी येथे त्यांची शंकर पार्वती नावाने जिनिंग आहे. सोमवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान झंवर यांनी एसबीआय बँकेतून ६ लाख रुपये काढले होते तर त्यांच्याकडे चाळीस हजार रुपये होते. एकूण ६ लाख ४० हजार रुपये त्यांनी दोन पिशव्यांमध्ये ठेवले होते. त्यापैकी एक लाख रुपये त्यांनी एका व्यक्तीला देऊन उर्वरित पाच लाख ४० हजार रुपये घेऊन ते आपल्या कारमधून राजुरीला जाण्यासाठी निघाले होते. मात्र उपवास असल्याने व सकाळपासून उपाशी असल्याने साठे चौकातील एक ज्यूस सेंटरसमोर त्यांनी कार (एम.एच.२३, एडी ३५४२) थांबवून चालक अशोक म्हेत्रेसह ते ज्यूस घेण्यासाठी गेले.
अवघ्या दहा मिनिटांत त्यांच्या कारच्या उजव्या बाजूच्या मागील दरवाजाची काच फोडून सिटवर ठेवलेल्या पैशांच्या दोन्ही पिशव्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लांबवल्या. ज्यूस पिऊन परत आल्यानंतर चालकाच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने झंवर यांना हा प्रकार सांगितला. शहरातील मध्यवर्ती व गजबजलेल्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सहायक पोलिस निरीक्षक सतीश जाधव हे करत आहेत.
घटना सीसीटीव्हीत कैद
दरम्यान, चोरीची ही सर्व घटना साठे चौकातील सीसीटीव्हीत कैद झाली अाहे. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून दुचाकीवरून आलेले दोघे, काच फोडताना व पळून जाताना दिसत आहेत. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.
डीवायएसपींची भेट
शहर पोलिसांत पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी भेट देत व्यापाऱ्याची चौकशी केली. काच फुटलेली कारही शहर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सीसीटीव्ही फुटेजचा महत्त्वाचा पुरावा मिळाल्याने लवकरात लवकर तपास लावण्यात येईल असे डीवायएसपी खिरडकर यांनी सांगितले.
पुढील स्लाइडवर पाहा, काच फोडलेली कार...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.