आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उस्मानाबाद - शहरातील गालिब नगर येथे वर्षभरापूर्वी कॅरम खेळत असताना पत्नीने दोनवेळा हरवल्याच्या रागातून पतीने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयापुढे सुनावणी होऊन आरोपी पती जावेद दस्तगीर काझी यास जन्मठेप व ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली अाहे.
सेंट्रिंग काम करणारा जावेद काझी व आस्मा यांचा २००८ मध्ये विवाह झाला असून त्यांना दोन मुले आहेत. ते उस्मानाबाद शहरात गालीब नगर येथे वास्तव्यास होते. दि.३ मे च्या रात्री ११ वाजता आरोपी जावेद हा दारू पिऊन घरी आला. यावेळी त्याने पत्नीला कॅरम खेळू म्हटल्याने दोघेही कॅरम खेळले. मात्र, यावेळी दोन्ही डावात पत्नीने हरवल्याने चिडलेल्या जावेदने अशा बायकांना जिवंत जाळून मारले पाहिजे असे म्हणाला. दरम्यान, त्यांच्या लहान मुलाने पाणी मागितल्याने आस्मा पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या. यावेळी पाठीमागून आलेल्या जावेदने बाटलीतील रॉकेल आस्माच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले होते.
यावेळी शेजाऱ्यांनी आग विझवून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथून सोलापूरला हलवण्यात आले. तेथे आनंदनगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी बी. बी. चव्हाण यांनी उपचारादरम्यान आस्मा यांचा मृत्यू पूर्व जबाब घेतला. त्यानंतर दि.२ जून २०१७ रोजी आस्मा यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक तांबे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणाची जिल्हा व सत्र न्यायाधीश -१ एसएएआर औटी यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी पोलिसांनी सादर केलेले पुरावे, साक्षी तसेच प्रकरणाची अतिरिक्त शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी मांडलेली खंबीर बाजू आदींचा विचार करून न्यायालयाने आरोपी जावेद दस्तगीर हल्ली गालीबनगर उस्मानाबाद) याला भांदवि कलम ३०२ अंतर्गत दोषी मानून जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास २ वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली.
स्टोव्हचा भडका उडाल्याचा जबाब दिला तरच उपचार
पती जावेद काझीने आस्माला बेसावध असताना अंगावर रॉकेल ओतून पेटवल्यानंतरच जिवाच्या आकांताने ती ओरडत घराबाहेर पडली. शेजाऱ्यांनी आग विझवली. अशा गंभीर परिस्थितीतही आरोपी पतीने तू गॅस संपल्याने स्टोव्हवर स्वयंपाक करत होतीस आणि भडका उडाला असा जबाब दिला तरच उपचारासाठी दवाखान्यात नेतो असे धमकावले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.